
सामना ऑनलाईन । कोट्टायम
केरळमध्ये 50 हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पोलिसांनी एका 25 वर्षीय युवकाला अटक केली आहे. त्याचे नाव प्रदीप कुमार असून एका महिलेच्या तक्रारीवरून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार प्रदीप कुमार सोशल मीडियावर महिलांशी मैत्री करायचा. नंतर त्यांचे फोटो घेऊन त्यांच्याशी छेडछाड करून ते अश्लील बनवत आणि हेच फोटो घेऊन प्रदीप महिलांना ब्लॅकमेल करायचा.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदीप सोशल मीडियावर महिलांशी जवळीक वाढवायचा आणि त्यांचे फोन नंबर मिळवायचा. या महिलांमध्ये गृहीणींचे प्रमाण अधिक होते. त्यांच्याशी मैत्री करून तो त्यांच्या कौटुंबिक समस्या जाणून घ्यायचा.
नंतर प्रदीप एखाद्या मुलीचे फेक अकाऊंट सुरू करून या महिलांच्या पतीशी मैत्री करत. त्यांच्याशी चॅट करून तो त्यांच्या पत्नींना चॅटचे स्क्रीनशॉट पाठवत आण तुमच्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे पटवून देत. त्यामुळे पत्नी आपल्या पतीशी दूर होऊन आरोपीच्या पिंजर्या अडकत. एकदा का महिला आपल्या पत्नीशी दूर झाल्या की तो त्यांच्याशी व्हीडीओ चॅट करत. नंतर या महिलांना त्यांचेच मॉर्फ केलेले अश्लील फोटो दाखवून त्यांना ब्लॅकमेल करत.
हे फोटो दाखवून प्रदीप त्यांचे लैंगिक शोषण करत. जर महिलांनी त्याने सांगितल्यानुसार नाही वागल्या तर ते फोटो त्यांच्या पतीला पाठवण्याची धमकी देत. प्रदीपला अटक केल्यानंतर पोलिसांना त्याच्या लॅपटॉपमध्ये हे फोटो सापडले.
त्याने महिलांशी चॅट करण्यासाठी एक कोड ठरवला होता. त्यानुसार ती महिलाच बोलते की नाही हे त्याला कळत असे. जेव्हा समोरून हा कोड मिळत नसे तेव्हा तो समोरच्याला शिव्या घालायचा. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.


























































