
सामना प्रतिनिधी, मुंबई
ब्रेकअप करून प्रेयसी मुंबईला निघून गेल्याने संतापलेल्या प्रियकराची सटकली. तिला धडा शिकविण्यासाठी त्याने तिच्या नावाने आठ बनावट फेसबुक खाते खोलले आणि त्यावर दररोज महिलांचे, सनी लिओनेचे नग्न फोटो अपलोड करू लागला. हा प्रकार वाढू लागल्यामुळे तिने घाटकोपर पोलिसांत तक्रार दिली. अखेर ब्रेकअपमुळे नको ते प्रकार करू लागलेल्या मजनूच्या हातात बेडय़ा पडल्या.
प्रवीण थिगले (27) असे त्या माथेफिरू मजनूचे नाव असून तो पुण्याच्या राजगुरूनगर परिसरात राहतो. तरुणीच्या तक्रारीनंतर उपनिरीक्षक मोहन जगदाळे व त्यांच्या पथकाने बनावट फेसबुक खात्यांचा तांत्रिक अभ्यास करून प्रवीणला ताब्यात घेतले. चौकशीत प्रवीणने गुह्याची कबुली दिली. त्याला अटक करण्यात आली, मात्र दोन दिवसांनंतर त्याची जामिनावर सुटका झाली.
summary- youth got tortured with fake facebook accounts
























































