नंदागौळ येथे रानडुकराच्या हल्ल्यात युवक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परळी

तालुक्यातील मौजे नंदागौळ येथील एका युवकावर रानडुकराने हल्ला केल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना परळी-नंदागौळ रस्त्यालगत वसंतनगर फाट्याजवळ घडली. जखमी युवकाला परळी येथील खाजगी रूग्णालयात प्राथमिक उपचार घेऊन पुढील उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

मनोहर रामकिशन गित्ते रा.नंदागौळ हे परळीहुन नंदागौळकडे जात असताना वसंतनगर फाट्याजवळ अचानक सहा ते सात रानडुकरे रस्त्यावर आली व गित्ते यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. यात मनोहर गित्ते हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या उजव्या हाताला व डावा पाय फॅक्चर झाला आहे. तसेच डोक्याला मार लागला आहे. या युवक शेतकर्‍याला प्रशासनाने मदत करावी अशी मागणी त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे.