युवाच्या आर्ट अँड क्राफ्ट उत्पादनांच्या श्रेणीमध्ये ‘युवा कॅनव्हास’

youva-canvas

नवनीतचा स्टेशनरी ब्रँड युवा (Youva)ने आपल्या आर्ट अँड क्राफ्ट उत्पादन श्रेणीमध्ये ‘युवा कॅनव्हास’ हे नवे उत्पादन बाजारात आणले आहे. सध्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये अनेक विद्यार्थी आपल्या सर्जनशील कौशल्यांची जोपासना करत आहेत. त्यामुळे या श्रेणीमध्ये कॅनव्हास हे एक लोकप्रिय उत्पादन बनले आहे यात शंका नाही. युवा कॅनव्हास बोर्डससाठी वापरल्या गेलेल्या विशेष साधनांमुळे हे कॅनव्हास अशाचप्रकारच्या इतर उत्पादनांहून सरस ठरत असल्याचे नवनीतकडून सांगण्यात येत आहे.

विद्यार्थी तसेच व्यावसायिक चित्रकार आणि कलाकारांना ते अधिक सोयीचे ठरत आहेत. हे उत्पादन सध्या महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा येथे उपलब्ध असून त्याची उपलब्धता देशभरात विस्तारण्याची कंपनीची योजना आहे.

युवा कॅनव्हासची काही अनोखी वैशिष्ट्ये आहेत. जसे की, हे कॅनव्हास अॅसिड फ्री असल्यामुळे रंग पसरत नाहीत व हा कॅनव्हास चित्राचे खरेखुरे रंग दीर्घकाळासाठी जसेच्या तसे पकडून ठेवतो, त्यावरील अॅक्रेलिक गेसो प्रायमरचा तिहेरी लेप त्याचा पांढरेपणा खूपच दाट करतो, गेसो प्रायमरमुळे कॅनव्हासवर रंग अधिक चांगल्या प्रकारे चिकटतात, योग्य प्रकारे शोषले जातात तसेच अधिक चमकदार बनतात

आपली प्रतिक्रिया द्या