राज्यात समस्या नसतील तर बूट घाला आणि पदयात्रेत सहभागी व्हा! मुख्यमंत्र्यांना दिलं आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
YSRTP-Chief-YS-Sharmila

युवाजन श्रमिका रिथू तेलंगणा पार्टी (वायएसटीआरपी) च्या प्रमुख वायएस शर्मिला यांनी गुरुवारी माध्यमांना संबोधित करताना शू बॉक्स सादर केला आणि सांगितले की, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेकर राव यांना एक जोड बूट भेट देत आहे. त्यांनी पुढे मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले की त्यांनी राज्यातील पदयात्रेत सहभागी व्हावे. पदयात्रा ज्या ठिकाणाहून आधी थांबवण्यात आली होती, त्याच ठिकाणाहून गुरुवारी पुन्हा पदयात्रा सुरू होणार आहे.

‘ते म्हणाले की हे ‘बंगारू तेलंगणा’ आहे आणि कोणतीही अडचण नाही. त्यांना माझ्यासोबत पदयात्रेत फिरू द्या. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे राज्यात काही समस्या नसतील तर मी राजकारणातून संन्यास घेईन’, असेही त्या म्हणाल्या.

‘परंतु हे खरे नसल्यास केसीआर यांना राजीनामा द्यावा लागेल आणि राज्यातील जनतेची माफी मागावी लागेल. त्यांनी वचन दिल्याप्रमाणे त्यांनी दलिताला मुख्यमंत्री बनवले पाहिजे’, असेही त्या म्हणाल्या. त्यांनी पुढे असा दावा केला की केसीआर यांनी खूप आश्वासने दिली आहेत परंतु त्यांनी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात ते अपयशी ठरले आहेत.

त्या पुढे म्हणाल्या की पदयात्रेचा शेवटचा टप्पा ज्या ठिकाणाहून थांबवला होता त्याच ठिकाणाहून पुन्हा सुरू होईल.