
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज गुरुवारी ‘युवासेना चषक’ क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन झाले. पहिल्या दिवसाच्या सामन्यांना क्रिकेटप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मखमलाबाद येथील क्रीडक मैदानावर या चारदिवसीय स्पर्धेचा शानदार शुभारंभ झाला. शिवसेना जिल्हा संपर्क उपनेते रवींद्र मिर्लेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यांनी सहभागी सर्व संघांना शुभेच्छा दिल्या, त्यांच्यासह खासदार राजाभाऊ वाजे, उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गीते व माजी आमदार वसंत गीते यांनी उत्कृष्ट आयोजनाबद्दल युवासेना जिल्हा युवा अधिकारी सागर कोकणे व पदाधिकाऱ्यांचे काwतुक केले. तसेच युवकांनी क्रीडा क्षेत्रात मोठय़ा संख्येने पुढे यावे, असे आवाहन केले.
पहिला सामना वक्रतुंड वॉरियर्स विरुद्ध शिवम मुळाणे 11 या संघांमध्ये रंगला, त्याला क्रिकेटप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी युवासेना विस्तारक मानस पुंवर, स्वाती पाटील, अस्लम मणियार, प्रमिला मैंद, राहुल ताजनपुरे, बाळासाहेब कोकणे, ऋषी वर्मा, शैलेश सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, क्रीडाप्रेमी मोठय़ा संख्येने हजर होते. यशस्वी आयोजनासाठी मानस पुंवर, सागर कोकणे, आकाश उगले, रोहन तांबे, आनंद अहिरे, अभिजीत गवते, संजय गोसावी, सुदर्शन चंदनानी, श्रीकांत चव्हाण आणि खेमराज नेरकर हे परिश्रम घेत आहेत.

























































