तत्काळ जामिनामुळे गुन्हेगार मोकाट, वाहन, सोनसाखळी चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यात वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोविडच्या भीतीने कारागृहात संसर्ग वाढू नये यासाठी गुन्हेगारांना तत्काळ दिला जाणारा जामीन आता डोकेदुखी ठरू लागला आहे. अटक झाली तरी पटकन जामीन मिळत असल्याने ते गुन्हेगारांच्या पथ्यावर पडू लागले आहे. कारागृहात जावेच लागत नसल्यामुळे चोरटे मोकाट सुटले असून शहरात गाडय़ा चोरी, सोनसाखळी चोरी, घरफोडीचे गुन्हे वाढू लागल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

राज्यातील कारागृहे कैद्यांनी हाऊसफुल्ल झाली आहेत. परिणामी कोविडचा वाढता धोका लक्षात घेता कारागृहांमध्ये संसर्ग वाढू नये याकरिता सात वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेल्या कैद्यांना जामीन दिला जात आहे. तर बऱयाच पैद्यांना पॅरोलवर सोडले जात आहे. असे करण्यामागचा हेतू चांगला असला तरी चोर, दरोडेखोर याचा गैरफायदा उचलू लागले आहेत. शहरात गाडय़ा चोरीचे प्रमाण फारच वाढले असून रोज कुठे ना कुठे सोनसाखळी चोरी, घरफोडय़ा सर्रास होऊ लागल्या आहेत. सायबर भामटे तर आर्थिक फसवणूक करण्यासाठी सापळा लावून बसलेच आहेत. त्यातच चोरदेखील सुसाट सुटल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. परळसारख्या गजबजलेल्या परिसरातील पटेल टॅरेस या इमारतीच्या दुसऱया मजल्यावर दोन दिवसांच्या अंतराने बंद घरे पह्डण्यात आली. आर. एम. भट शाळेजवळून बुलेट चोरण्यात आली. याशिवाय ठिकठिकाणी सोनसाखळी चोऱया होऊ लागल्या आहेत. हत्येप्रकरणातील निलंबित कॉन्स्टेबल विनायक शिंदे हा कोविडमुळे पॅरोलवर बाहेर आला होता. मात्र त्याला मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आली.

 आम्ही आरोपींना पकडतो पण त्यांना जामीन मिळत असल्याने त्याचा ते फायदा उचलू लागलेत. हे चित्र येत्या काळात आणखी भयानक होईल, अशी भीती पोलिसांमधून व्यक्त होत आहे. पोलीस तर तैनात आहेतच परंतु नागरिकांनीदेखील सजग व्हायला पाहिजे. गणेशोत्सवासाठी बरेच नागरिक बाहेरगावी जातात. पण जाताना घरात मौल्यवान ऐवज ठेवू नका. प्रवास करताना किंवा घराबाहेर जाताना दागिने घालण्याचा मोह टाळावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
 नशेबाज गुन्हेगारांकडून होणारे गुन्हेदेखील वाढले लागले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज सहज उपलब्ध होत असल्याने त्याची नशा करण्यासाठी नशेबाज गुन्हे करू लागले आहेत.