10 महिन्यांच्या बालिकेवर नोकराचा बलात्कार, उत्तर प्रदेशातील हादरवणारी घटना

उत्तर प्रदेशात अवघ्या 10 महिन्यांच्या बालिकेवर बलात्कार करण्यात आला आहे. हा बलात्कार घरातल्याच नोकराने केल्याचं पोलीस तपासात कळालं आहे. या बालिकेवर अतिअत्याचार केल्याने तिच्या नाजूक अंगांना जबरदस्त हानी पोहोचली आहे. या चिमुरडीला किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठातील लहान मुलांवरील शस्त्रक्रिया विभागात भरती करण्यात आलं आहे.

लखनऊतील सादतगंज भागात ही घटना घडली आहे. बालिकेची आई स्वयंपाकघरात काम करत असताना तिला मुलीच्या जोरजोराने रडण्याचा आवाज ऐकायला आला. ति मुलीच्या खोलीकडे धावत गेली असता तिला खोलीमध्ये सन्नी नावाचा त्यांचा नोकर आक्षेपार्ह अवस्थेत दिला होता. मुलीच्या आईने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो तिला हिसका मारून पळून गेला. यानंतर बालिकेच्या घरच्यांनी पोलिसांत तक्रार दिली. सादतगंज पोलिसांनी वेळ न दवडता तपास सुरू केला आहे. सन्नीला अटक केली. पोलिसांनी सन्नीविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत तसेच बलात्कारासाठीच्या कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. बालिकेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिची अवस्था पाहून डॉक्टर जे.डी.रावत यांनी तिच्यावर तातडीने उपचार सुरू केले. बलात्कारामुळे बालिकेच्या गुप्तांगाला जबरी इजा झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. बालिका शुद्धीवर असली तरी तिला प्रचंड वेदना होत असल्याचं डॉ.रावत म्हणाले. यातच बालिकेला जंतुसंसर्ग झाल्याचेही डॉक्टरांना दिसून आले. बालिकेला अजून त्रास होऊ नये यासाठी तिला अॅनास्थेशिया देण्यात आला असून जंतुसंसर्ग दूर झाल्यानंतर गरज भासल्यास शस्त्रक्रिया करण्यात येईल असे डॉक्टरांनी सांगितले आहे. IANS या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.