शेतकऱ्याने पिकवला तब्बल 1000 किलोचा भोपळा; जागतिक विक्रमाची नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निसर्गाच्या लहरीवर शेती अवलंबून असते. त्यामुळे पावसाचा अंदाज घेत शेतकऱ्यांना पीक घ्यावे लागते. मात्र, निसर्गाच्या लहरीवर मात करत शेतीत यश मिळवत विक्रम करण्याची किमया ओहियोमधील शेतकऱ्यांनी केली आहे. या दोन शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात तब्बल 2,164 पौंड म्हणजे 1000 किलोचा भोपळा पिकवला आहे. याची नोंद जागतिक विक्रमात झाली आहे.

या विशालकाय भोपळ्याचे उत्पादन घेत जागतिक भाजी उत्पादन स्पर्धेत या भोपळ्याची नोंद झाली आहे. त्यामुळे हा विक्रम ठरला आहे. टॉड आणि डोना स्किनर हे दोन शेतकरी 30 वर्षांपासून त्यांच्या शेतीत भोपळ्याचे उत्पादन करत आहेत. यंदा काहीतरी वेगळे करण्याचे ठरवून त्यांनी विशालकाय भोपळा पिकवण्याचे ठरवले. ज्यावेळी याचे उत्पादन आले आणि हा भओपळा तब्बल 1000 किलोचा असल्याचे समजले त्यावेळी त्यांना आनंद झाला. डबलीनमध्ये होणाऱ्या ओकलैंड नर्सरी नेशनल स्क्वैश वेट-ऑफ स्पर्धेत हा विक्रम नोंदवणार अशी अपेक्षा होती. ती सत्यात उतरल्याने या दोन शेतकऱ्यांनी सांगितले.

या भोपळ्याचे उत्पादन घेताना याचे वजन इतर भोपळ्यांपेक्षा जास्त असेल याचा अंदाज होता. मात्र, याची विक्रमात नोंद होईल, असे वाटले नव्हते. मात्र, याची जागतिक विक्रमात नोंद झाल्याने केलेल्या मेहनतीला चांगले फळ आले आहे, असे त्यांनी सांगितले. आता जगातील सर्वात विशालकाय भोपळा पिकवण्याचा विक्रम या शेतकऱ्यांचा नाववर झाला आहे. याआधी ओहियोतीलच एका शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या नावावर या विक्रमाची नोंद होती.