मणिपूरमध्ये पोलिसांच्या गणवेशातील 11 सशस्त्र ग्रामसंरक्षक अटकेत

मणिपूरच्या बिष्णुपूर जिह्यात पोलिसांना गस्त घालताना पोलिसांच्या गणवेशातील 11 सशस्त्र नागरिक आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडील शस्त्रsही हस्तगत केली. त्यानंतर महिलांनी पोलिसांना घेरत सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. एका महिलेच्या हाती मशालही होती. या महिलांनी अटक केलेल्यांना सोडण्याची आणि सर्व शस्त्रs परत करण्याची मागणी केली. ते सर्वजण ग्रामसंरक्षक असल्याचा दावा महिला आंदोलनकर्त्यांनी केला. जमाव आणखी आक्रमक होऊ नये यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. ज्या 11 जणांना पोलिसांनी अटक केली ते सर्वजण ग्रामसंरक्षक असल्याचा दावा आंदोलनकर्त्या महिलांनी केला.