क्रौर्याचा कळस, 14 कुत्रे आणि 7 मांजरांना विष देऊन मारले

26

सामना ऑनलाईन । पुणे

पुण्यातील येरवडा परिसरात 14 कुत्रे आणि 7 मांजरांना विष देऊन मारण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येरवड्याच्या प्रायडल नगर सोसायटीमध्ये हा प्रकार घडला आहे. मुक्या प्राण्यांवर विषप्रयोग करून त्यांची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

एकाचवेळी 14 कुत्रे आणि 7 मांजरांना विकृत मानसिकतेतून मारून टाकले असावे अशी शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्राणी मित्रांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला असून,आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या