भाजपच्या राजवटीत उत्तर प्रदेशात डॉ. आंबेडकरांच्या 151 पुतळ्यांची नासधूस, अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप सरकारच्या काळात उत्तर प्रदेशातील 72 जिह्यांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तब्बल 151 पुतळ्यांची नासधूस करण्यात आली आहे. संविधान बदलण्यात अपयश आल्याच्या रागातून भाजपशी संबंधित लोकांनी हे कृत्य केल्याचा घणाघाती आरोप समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज केला.

पक्ष कार्यालयात पत्रकारांशी बोलताना अखिलेश यांनी योगी सरकारवर जोरदार टीका केली. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या विचारांच्या संघटना जेव्हा-जेव्हा हल्ले करतात, तेव्हा त्यांचे लक्ष्य संविधान असते. त्यातूनच बाबासाहेबांच्या पुतळ्यांवर हल्ले होतात. अशा 151 प्रकरणांची माहिती आम्हाला मिळाली आहे. याचाच अर्थ वर्षाला सरासरी 15 पुतळ्यांची नासधूस करण्यात आली आहे, असे अखिलेश म्हणाले. नोंद न झालेल्या अशा हल्ल्यांची संख्या कितीतरी अधिक असू शकते, असेही ते म्हणाले.