
दारूच्या नशेत मित्राला चिडवल्यावरून तरुणाची हत्या झाल्याची घटना मालाड येथे घडली. शुक्रवारी रात्री श्रीकांत जाधव याने चेतन, सनील उैर्फ पानसो यांच्यासोबत रात्री उशिरापर्यंत मद्यप्राशन केले. तेव्हा श्रीकांतने चेतनची मस्करी करून त्याला चिडवण्याचा प्रयत्न केला. त्याचा चेतनला राग आला. त्या रागातच चेतनने श्रीकांतला चाकूने भोसकले. यात श्रीकांतचा मृत्यू झाला. या प्रकरणी कुरार पोलिसांनी चेतनला अटक केली.




























































