1600 पेक्षा जास्त हिंदुस्थानी कंपन्यांमध्ये चीनची सात हजार कोटींची गुंतवणूक

528

एप्रिल 2016 ते मार्च 2020 या कालावधीत देशातील 1600 पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये चीनने 1 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे सात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली अशी माहिती केंद्र सरकारने मंगळवारी राज्यसभेत दिली. यामध्ये बहुतांश स्टार्ट-अप कंपन्यांचा समावेश आहे.

एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी ही माहिती दिली. वाहन उद्योग, छपाई, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल उपकरणे आणि सेवा क्षेत्र अशा 46 क्षेत्रांमधील या कंपन्या आहेत. थेट परदेशी गुंतवणूकीअंतर्गत या कंपन्यांमध्ये चीनने गुंतवणूक केली आहे. वाहन उद्योगातील कंपन्यांमध्ये चीनने सर्वाधिक 172 दशलक्ष डॉलर्स इतकी गुंतवणूक केली असून त्यानंतर सेवा क्षेत्राला प्राधान्य दिले आहे असे ठाकूर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या