लम्पी आजाराने सोलापुरात 1900  जनावरांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लम्पीच्या संसर्गाने जिल्ह्यात आजवर 1900हून अधिक जनावरांचा मृत्यू झाला असून, साडेसात हजार जनावरे लम्पीने बाधित आहेत. आतापर्यंत अवघ्या साडेचारशे जणांना नुकसानभरपाई देण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये सात हजार 446 जनावरांना लम्पी आजाराची लागण झाली आहे. सर्वाधिक जनावरे माळशिरस तालुक्यात आहेत. या आजाराने आतापर्यंत 1927 जनावरे दगावली असून, पशुपालकांत चिंतेचे वातावरण आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली असून, तरीही आजार अद्यापि आटोक्यात आलेला नाही. आतापर्यंत अवघ्या 446 लम्पी आजाराने मृत पावलेल्या पशुपालकांना नुकसानभरपाई देण्यात आली आहे. 250 प्रस्ताव अद्यापि प्रलंबित आहेत. लम्पी रोगाच्या वाढत्या प्रसारामुळे जिह्यातील पशुपालक मात्र धास्तावलेले आहेत.