आयपीएलला दणदणीत प्रतिसाद, 20 कोटी जनतेने बघितली सलामीची लढत

कोरोनाच्या काळातही आयपीएलला उदंड प्रतिसाद मिळत आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला 19 सप्टेंबरपासून युएईत सुरूवात झाली. मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपरकिंग्स यांच्यामध्ये झालेली सलामीची लढत तब्बल 20 कोटी क्रिकेटप्रेमींना बघितली. अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी यावेळी दिली.

कोरोनामुळे आयपीएल लढती बघण्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी देण्यात आलेली नाही. पण तरीही टीव्ही, ऑनलाईन या माध्यमांतून  जगभरातून कोटय़वधी जनता या स्पर्धेतील लढती बघत असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. कोणत्याही देशातील मोठय़ा स्पर्धेतील उद्घाटनीय लढतीला इतका उदंड प्रतिसाद याआधी मिळालेला नाही हे विशेष.

आपली प्रतिक्रिया द्या