रस्ता ओलांडताना ट्रकने उडवले व फरफटत नेले, कॅनडात हिंदुस्थानी तरुणाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सायकलवरून रस्ता ओलांडणाऱ्या एका २० वर्षीय हिंदुस्थानी विद्यार्थ्याला कॅनडामध्ये एका पिकअप ट्रकने धडक दिली. अपघातानंतर ट्रकने विद्यार्थ्याला फरफटत दूरपर्यंत नेल्याने त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजता योंगे स्ट्रीट आणि सेंट क्लेअर अव्हेन्यूच्या चौकात ही घटना घडली.

कार्तिक सैनी असे त्या विद्यार्थ्याचे नाव असून तो 2021 मध्ये हिंदुस्थानातून कॅनडाला आला होता. कार्तिकहा शेरडिन कॉलेजचा विद्यार्थी होता. दिवसा तो कॉलेजला जायचा व दुपारनंतर पार्ट टाईम जॉब करायचा. नेहमी प्रमाणे तो कामाला जात असताना एका भरधाव ट्रकने त्याच्या सायकलला धडक दिली. या धडकेनंतर ट्रक चालक थांबला नाही त्याने कार्तिकला फरफटन नेले.

या वर्षी सप्टेंबर महिन्यात हिंदुस्थानी विद्यार्थी सतविंदर सिंग याचा कॅनडातील ओंटारियो प्रांतात गोळी लागून मृत्यू झाला होता. सतविंदर कॅनडात मार्केटींगमध्ये एमबीएचे शिक्षण घेत होता. त्याआधी एप्रिल महिन्यात कार्तिक वासूदेव या तरुणाचा देखील गोळ्या घालून खून करण्यात आला होता. जेम्स टाऊन येथे ही घटना घडली होती.