
पैसे कमवण्यासाठी कोण काय मार्ग पत्करेल याचा नेम नसतो. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका तरुणीने तीन बॉयफ्रेंड गटवून पैसे कमवले आहेत. हे तिघेही श्रीमंत असून तिच्यापेक्षा वयाने बरेच मोठे आहेत.
आशा चोप्रा असं या तरुणीचं नाव आहे. ती 20 वर्षांची आहे. तिने तीन श्रीमंत पुरुषांशी प्रेमसंबंध जोडले आहेत. या तिघांसोबत नात्यात राहिल्यामुळे तिची प्रतिमहिना कमाई काही लाखांमध्ये पोहोचली आहे.
तिच्या म्हणण्यानुसार, तिने वयाच्या 18व्या वर्षापासून श्रीमंत बॉयफ्रेंडचा शोध सुरू केला होता. तिने अशा एका वेबसाईटमध्ये नोकरी करायला सुरुवात केली, जिथे लोकांशी प्रेमळ गप्पा मारण्याचे पैसे दिले जातात. तेव्हा तिला दिवसाला 8 हजार इतके पैसे मिळत होते. हळुहळू तिने 10 मिनिटांसाठी दहा हजार इतके पैसे आकारायला सुरुवात केली. काही काळाने आपणच श्रीमंत बॉयफ्रेंड गटवावेत अशी कल्पना तिला सुचली.
तिला आता तीन बॉयफ्रेंड आहेत. ते तिघेही तिच्याहून खूप मोठे आहेत. तिचा तिसरा बॉयफ्रेंड 29 वर्षांचा आहे. ती क्रमाक्रमाने त्यांना भेटते. त्यांच्याकडून तिला महागड्या भेटवस्तू आणि पैसे मिळतात. आशा सध्या महिन्याला 4 ते 6 लाख रुपये कमवते. त्याव्यतिरिक्त तिला महागड्या भेटवस्तूही मिळतात. तिचे ब्युटी पार्लरचे आणि मेकअपचे खर्चही तिचे बॉयफ्रेंड करतात.
























































