
सामना ऑनलाईन, मुंबई
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल पंपांची संख्या कमी असल्याने वाहन मालक आणि तेल कंपन्याना सततच्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे . फक्त 225 पेट्रोल पंप कार्यरत असल्याने सर्व ग्राहकांची गर्दी तिथे होते,त्यामुळे त्यांना आपला बराचसा वेळ हा तिथल्या रांगेत ऊभं राहण्यात घालवावा लागतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक पेट्रोल पंपाचे जमिनदार हे पंपाचे नूतनिकरण करण्यास तयार नसल्याने जवळपास 25 पेट्रोल पंप हे बंद होण्याची शक्यता दर्शवली जात आहे. जमिनदारांना पेट्रोल पंप चालवण्यापेक्षा रिअल इस्टेट मध्ये जास्त रस असल्याने ते सगळे या नूतनिकरणास विरोध करत आहेत. या सर्व प्रकाराची धास्ती घेऊन तीन प्रमुख तेल कंपन्यांच्या प्रतिनीधींनि मुख्य सचिव डी.के.जैन यांची 29 डिसेंबर रोजी भेट घेतली.
राज्य सरकारच्या समन्वयक समितीचे अध्यक्ष संतोष निवेंद्रकर यांच्या नेतृत्वाखाली प्रतिनीधींनी जैन यांना काही प्रश्न विचारले, यावेळी त्यींनी जैन यांच्याकडे पेट्रोल पंपासाठी अधिक जमिनीची मागणीही केली, परंतू जैन यांनी प्रतिनीधींची ही मागणी अमान्य केली. तुम्ही आधी मागणी केली असती तर कोस्टल रोडच्या योजनेत काहीतरी तरतूद करता आली असती, मात्र आता काही करता येणार नाही असे जैन यांनी यावेळी सांगीतले आणि तुम्ही याबाबत एमएमआरडीए आणि सीटी इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ( सीआयडीसीओ ) कडे चौकशी करा असा सल्ला दिला.
राज्य परिवहन खात्याच्या आकडेवारीनुसार दिवसागणिक 500 नवीन गाड्या मुंबईच्या रस्त्यांवर धावतात. त्या तुलनेत पेट्रोल पंपांची संख्या अतिशय कमी आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये 34 पेट्रोल पंपांना टाळे लागले आणि केवळ 2 नवीन पंप उभारण्यात आले आहेत.
आतापर्यंत जेवढेही पेट्रोल पंप बंद झाले आहेत त्यातले बहुतेक पंप हे दक्षिण मुंबई मधले होते. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांचे आतापर्यंत माहिम,अंधेरी,दादर, कांदिवली, विले-पार्ले,वरळी,मुंबई सेंट्रल, जुहू आणि पेडर रोड येथिल तर; भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांचे आतापर्यंत चेंबुर, भायखळा, आग्रीपाडा, खार वेस्ट, ग्रॅंट रोड, परेल आणि वरळी आदी भागातले पंप बंद झाले आहेत.


























































