सोलापूरजवळ तेलंगाणाची बस अपघातानंतर पेटली, 13 जण जखमी

22

सामना ऑनलाईन, सोलापूर

सोलापूर शहराजवळ रस्त्यावरून संथ गतीने जात असलेल्या एका ट्रकला बस धडकल्याने भीषण अपघात झाला. अपघातानंतर या बसने पेट घेतला असून या दुर्घटनेमध्ये 13 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. हैदराबादहून पुण्याकडे जात असलेल्या लक्झरी बसने सोलापूर विद्यापीठाजवळ बॅटरी वाहून नेत असलेल्या एका ट्रकला मागून धडक दिली. ही धडक इतकी जोरात बसली की दोन्ही वाहनांनी पेट घेतला. स्थानिक नागरीक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बसमधील लोकांची सुटका केली. पहाटे चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आंध्र रोडवेजची ही बस असल्याचं सांगण्यात आलं आहे. अपघात बसच्या ड्रायव्हरच्या चुकीने झाला असावा असा संशय आहे.

आपली प्रतिक्रिया द्या