अवकाळी पावसाने सातारा जिह्याला सलग तिसऱया दिवशी झोडपले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खंडाळा, कोरेगाव, कराडसह जिह्यात विविध ठिकाणी आज ढगांच्या आतषबाजीसह आणि सोसाटय़ाच्या वाऱयासह अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. शिरवळ परिसरात जवळपास पाऊणतास जोरदार गारपीट झाली. त्यामुळे स्मशानभूमीची संरक्षण भिंत कोसळली. कराड शहरात दोन ठिकाणी वीज पडण्याच्या घटना घडल्या. अवकाळीच्या या दणक्याने काही ठिकाणी झाडे, विजेचे खांब तसेच मोठमोठे हार्ंडग्ज कोलमडून पडली आहेत.

सातारा जिह्यात आजही सकाळपासून उन्हाचा कहर होता. मध्यान्हीला तर रस्त्यावरील वर्दळही रोडावलेली दिसली. उकाडय़ाने अक्षरशः काहिली होत होती. दुपारनंतर जिह्यात सर्वदूर आकाश अंधारून आले. सोसाटय़ाचा वारा आणि विजांचा कडकडाट होत राहिला. मात्र, बहुतेक ठिकाणी पावसाने हुलकावणी दिली. तथापि, शिरवळ व परिसरात दुपारी चारनंतर जोरदार गारपीट झाली. त्यासोबत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊसही झाला. तासाभराच्या या तांडवात परिसरात झाडे, मोठमोठे हार्ंडग्ज कोसळण्याच्या घटना घडल्या. खंडाळा तालुक्यात अन्यत्रही दमदार पावसाने हजेरी लावली.

कोरेगाव तालुक्यात विशेषतः रहिमतपूर परिसराला पाच ते साडेसहा असा दीड तास अवकाळी पावसाने झोडपून काढले. रहिमतपूरचा आज आठवडी बाजार होता. त्यामुळे सर्वत्र गर्दी होती. अचानक पावसाने जोरात सुरुवात केल्याने बाजारकरूंसह व्यापारी लोकांचीही धांदल उडाली.

कराड शहर व आजूबाजूच्या परिसरातही सायंकाळी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. सोसाटय़ाचा वारा व विजांचे तांडव यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. शहर परिसरात दोन ठिकाणी वीज पडल्याच्या घटना घडल्या. तथापि, जीवित अथवा वित्तहानीचे कसलेही वृत्त नाही.

शिरवळ परिसराला गारपिटीसह बसलेल्या अवकाळीच्या तडाख्याने वैकुंठ स्मशानभूमीची संरक्षक भिंत कोसळली. तथापि, पाऊस उघडल्यानंतर शिरवळचे सरपंच रविराज दुधगावकर यांनी जागोजागी जाऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच, स्मशानभूमीची पडलेली भिंत पुन्हा उभी करण्याचे आदेश तत्काळ दिले. त्याप्रमाणे त्या ठिकाणी लगेच स्वच्छता करून मापेही घेतली गेली. उद्या सकाळीच संरक्षक भिंतीचे काम सुरू होणार आहे.

जिह्यात काही ठिकाणी अवकाळीचा धुमाकूळ सुरू असताना आणि पाऊस पडेल असे वातावरण असताना वाई, जावली, महाबळेश्वर, सातारा, माण, खटाव, फलटण तालुक्यांना पावसाने हुलकावणी दिली.