
सामना ऑनलाईन । बिजापूर
छत्तीसगडमधील बिजापूर घाटी परिसरात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात चार जवानांसह सहा जण जखमी झाले आहे. जखमींना तत्काळ बिजापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
4 BSF jawans, one DRG and one civilian injured in IED blast in Bijapur Ghatti (7 kms from Bijapur). All injured have been admitted to a hospital in Bijapur. Exchange of fire underway b/w security forces&naxals,situation under control:P Sundarraj, DIG-Anti-Naxal Ops, #Chhattisgarh pic.twitter.com/hyQUcd7ADg
— ANI (@ANI) November 14, 2018
#Visuals of BSF jawans injured in IED blast in Bijapur Ghatti today, being treated at district hospital in Bijapur, #Chhattisgarh pic.twitter.com/4XEGGNxnaD
— ANI (@ANI) November 14, 2018
बिजापूर घाटीत आज सकाळी नक्षलवादी आणि सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीत बीएसएफचे चार जवान, शोध पथकातील एक अधिकारी व एक सामान्य नागरिक जखमी झाले. अद्याप ही चकमक सुरू आहे. मात्र परिस्थिती कंट्रोलमध्ये असल्याचे नक्षलविरोधी पथकाचे उपमहानिरीक्षक पी सुंदरराज यांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नक्षलवाद्यांनी हिंसक कारवाया करीत दहशत माजवली होती. यावेळी दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात पाच जवान जखमी झाले होते.























































