4 पीबीए हे औषध रोखणार कोरोनाला

कोरोना संसर्गावर उपयोगी ठरू शकेल असे एक नवीन औषध शोधल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. सध्या या औषधाचा उपयोग हा वेदनाशामक किंवा इतर कारणांसाठी केला जातो.

लॉस एंजल्समधील पॅलिपहर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे की, 4 फेनिलब्युटिरिक ऑसिड (4 पीबीए) हे औषध प्राण्यांमध्ये कोविडवर गुणकारी ठरले आहे. हे संशोधन ‘सायटोकिन वग्रोथ फॅक्टर्स रिव्ह्य़ू’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले असून कोविड रुग्णात सायटोकिन रेणू जास्त सुटत असतात. शरीराच्या प्रतिरक्षा प्रणालीचा (इम्युनिटी ) तो एक भाग असतो. या रेणूंचे प्रमाण वाढल्यास  बहुअवयव विकलांगता येऊन माणूस मरतो. अनेक गंभीर आजारात सायटोकिन रेणूंचे हे वादळ रोखणे गरजेचे असते. जेव्हा पेशी विषाणूंच्या संसर्गाच्या ओझ्याखाली असतात तेव्हा त्यांना सायटोकिन म्हणतात. त्यांच्यावर जास्त ताण आला तर तो त्या पसरवत जातात. त्यामुळे पेशींवरचा ताण कमी करणे हा कोविड 19 रुग्णांसाठी एक उपाय आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होईल असे स्पेनमधील मॅलगा विद्यापीठाचे इव्हान डय़ुरॉन यांनी सांगितल.

आपली प्रतिक्रिया द्या