खेळता खेळता धान्य साठवण्याच्या कोठीत पडले, 5 मुलांचा गदमरून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rajsthan-police

धान्य साठवण्याच्या कोठीत पडून 5 लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ही धक्कादायक घटना राजस्थानच्या बिकानेरमधील हिम्मतसार येथे घडली. ही पाच मुलं रविवारी धान्याच्या कोठीत उड्या मारण्याचा खेळ खेळत होती. मात्र कोठीत पडल्यानंतर गुदमरून त्यांच्या मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धान्याची ती कोठी रिकामी होती आणि त्याचं झाकण उघडं होतं. मुलांनी खेळता खेळता एका पाठोपाठ एक सर्वांनी त्यात उडी मारली. हा प्रकार सुरू असतानाच अचानक कोठीचा दरवाजा बंद झाला आणि गुदमरून या पाच मुलांचा मृत्यू झाला.

सेवाराम (4), रविना (7), राधा (5), पूनम (8) आणि माली अशी या पाच जणांची नावं आहेत. मुलांची आई घरी आली आणि घरात मुलं दिसली नाहीत म्हणून शोधाशोध सुरू झाली. जेव्हा तिनं दरवाजा उघडला तेव्हा मुलं आत बेशुद्धावस्थेत पडल्याचं तिला दिसलं. तिनं पाचही जणांना बाहेर काढलं आणि सरकारी रुग्णालयात भरती केलं. वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रीति चंद्रा यांनी ही माहिती दिली आहे.