
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 65 जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. क्रिकेटपटू रोहित शर्माला पद्मश्री, गायिका अलका याज्ञिकला पद्मभूषण तर अभिनेता आर. माधवन यांच्यासह एकूण 65 जणांना पद्म पुरस्कार देण्यात आला. यामध्ये दोन पद्मविभूषण, सात पद्मभूषण आणि 56 पद्म पुरस्कारांचा समावेश आहे. या समारंभाला उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.




























































