पेनकिलर आणि अँटिबायोटिक्ससह 70 अत्यावश्यक औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्यांसाठी उपचार स्वस्त होणार आहेत. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीच्या (एनपीपीए) झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीच्या बैठकीत काही अत्यावश्यक औषधांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. एनपीपीए हे देशात विकल्या जाणाऱया अत्यावश्यक औषधांच्या किमती नियंत्रित करते. बैठकीत चार विशेष औषधांसह 70 औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 70 औषधांमध्ये वेदना कमी करण्यासाठीची औषधे म्हणजेचं वेदनाशामक, अँटिबायोटिक्स, ताप, संसर्ग, अतिसार, स्नायू दुखणे, मधुमेह, रक्तदाब, हृदय आणि इतर अनेक आजारांवरील औषधांचा समावेश आहे. यापूर्वी जून महिन्यातही अनेक जीवनावश्यक औषधांच्या किंमती कमी करण्यात आल्या होत्या. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने जूनमध्ये झालेल्या बैठकीत सामान्यतः वापरल्या जाणाऱया 54 औषधांच्या आणि आठ विशेष औषधांच्या किमती कमी केल्या होत्या.