टास्कच्या नादात 9 लाख रुपये गमावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टास्क पूर्ण केल्यास चांगला फायदा देऊ असे सांगून ठगाने एकाची 9 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कुरार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदाराला दिवसांपूर्वी एकाचा मेसेज आला. टास्क पूर्ण केल्यावर पैसे मिळतील असे त्यांना सांगण्यात आले.

त्यानंतर त्या पेजवरील 28 टास्कचे पॅकेज तक्रारदार यांनी विकत घेतले. सुरुवातीला तक्रारदाराच्या खात्यात 12 हजार रुपये जमा झाले. त्यांना खात्री पटल्यावर त्यांनी आणखी पैसे गुंतवले. आणखी एका टास्कसाठी त्यांच्याकडे पैशाची मागणी होऊ लागली. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी कुरार पोलीस ठाण्यात धाव घेतली.