गोवर रुबेला लसीवर मुस्लिमांचा बहिष्कार कायम ; आजही अनेक शाळातून नकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजेश देशमाने । बुलढाणा 

गोवर रुबेला लसीकरणामुळे नपुंसकत्व येते या अफवेमुळे अजुनही मुस्लीम पालक आपल्या मुलांना लस देण्यास नकार देत आहेत. आज ३ डिसेंबर सोमवारी बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथील उर्दु प्राथमिक माध्यमिक शाळेतील ६९९ पालकांनी लेखी नकार देऊन आमच्या मुलाला लस देऊ नये अशी ताकीद मुख्याध्यापकाला दिली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या टीमला तिथून मोकळ्या हाताने परतावे लागले, अशाच प्रकारे जिल्ह्यात आज अनेक उर्दू शाळांनी नकार दिल्याची माहिती आहे.

‘भाजप संघ सरकारने मुस्लीम कौम को नपुंसक बनाने के लिए गोवर रुबेला लस निकाली है’ असा व्हिडीओ संबंध बुलढाणा जिल्ह्यात फिरत असल्यामुळे मुस्लिम पालकांनी गोवर रुबेला लस पाल्यांना देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा मस्जीदमध्ये मुस्लीम वस्तीत उच्च शिक्षित मुस्लीम लोकांच्या बैठका घेऊनही प्रशासनाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. शनिवार पर्यंत २५ शाळांनी नकार दिला होता. सोमवारी ११ वाजता पुन्हा आरोग्य यंत्रणेची ही मोहीम शाळेवर सुरु झाली. सोमवारी ११ वाजता रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अरुण जवंजाळ यांच्यासह २० कर्मचार्‍यांची टीम रायपूर जिल्हा परिषद उर्दु प्राथमिक व उर्दु हायस्कूलवर गेली असता शाळेचे मुख्याध्यापक मिर्झा रहेमान बेग यांनी सदर गोवर रुबेला लस घेण्यास ६९९ पालकांनी नकार पत्र लिहून दिले आहे.

मुल ही लस घेण्यास तयार नसल्याचे सांगितले. पालकांनी सुद्धा आमच्या मुलाला लस देऊ नये अशी ताकीद दिली आहे. याउपरही आरोग्य विभागाच्या टिमने त्यांना लसीचे महत्व पटवून सांगितले. परंतू ते मानण्यास तयार नव्हते. त्यामुळे डॉ. जवंजाळ यांच्या टिमला मोकळ्या हाताने परतावे लागले. अशाच प्रकारे जिल्ह्यात अनेक ऊर्दू शाळांनी आज लस घेण्यास नकार दिल्याच्या तक्रारी समोर आल्या आहे.