
सामना ऑनलाईन । मुंबई
थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी सगळ्यात बेस्ट ठिकाण कोणतं असा प्रश्न विचारला तर गोवा हे उत्तर हमखास येणार. पण, गेल्या पाच सहा वर्षांमध्ये हे चित्र बदलताना दिसतंय. कारण, पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरवत वेगळे पर्याय चाचपायला सुरुवात केली आहे. त्यामुळे 2018च्या थर्टीफर्स्टच्या पार्टीच्या बुकिंगमध्ये तब्बल 40 टक्क्यांची घट आल्याचं गोव्यातील पर्यटनाशी संबंधित व्यावसायिकांचं म्हणणं आहे.
याची सुरुवात परदेशी पर्यटकांपासून झाल्याचं निरीक्षणही व्यावसायिकांनी नोंदवलं आहे. हिंदुस्थानात येणारे पर्यटक गोव्याला हटकून भेट देतातच. पण, गेल्या काही काळात याचं प्रमाण घटलं आहे. 2018च्या थर्टी फर्स्टच्या पार्टीतही परदेशी पर्यटकांची संख्याही 40-50 टक्क्यांपर्यंत घटली आहे. याची वेगवेगळी कारणंही समोर आली आहेत. त्यात गोव्यात थर्टी फर्स्टला होणारी गर्दी, वाहतुकीचे आणि हॉटेल्सचे वाढलेले दर ही प्रमुख कारणं असल्याचं समोर आलं आहे. गोव्यात गर्दीमुळे दर प्रचंड महाग होतात. तसंच ज्या शांततेसाठी लोकं समुद्र किनाऱ्यावर जातात, ती शांतता त्यांना मिळत नाही. त्या तुलनेने कोकण शांत असल्यामुळे अनेक पर्यटक तिथे मोर्चा वळवत आहेत.
पाहा व्हिडीओ-
दुसरीकडे, थायलंडसारख्या देशांनीही व्हिसाच्या किमतीत सवलत दिली आहे. तसंच विमान कंपन्यांनी दिलेली तिकीटांची सवलत, त्यात एक देश फिरून आल्याचं समाधान अशा अनेक फायद्यांचाही त्यात समावेश होतो. त्यामुळे गोव्यात होणाऱ्या खर्चापेत्र त्यामुळे पैसे मोजून गोंधळात थर्टी फर्स्ट साजरा करण्यापेक्षा थायलंड, बाली, श्रीलंका अशा ठिकाणी जाण्यास प्राधान्य देत आहेत. तसंच गोव्यात मोठी डीजे किंवा म्युझिक नाईट होत नसल्यानेही अनेक पर्यटक गोव्याला चांगले पर्याय शोधून लागले आहेत.


























































