
सामना ऑनलाईन । महाबळेश्वर
महाबळेश्वर विभागातील तापोळा भागात मोठया प्रमाणात वन संपदा असून काही स्थानिक लोक व काही पर्यटकांच्या सिगारेटच्या थोटकांमुळे जंगलात आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच मध मिळण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. वन विभागाला वारंवार सांगूनही वन विभाग याकडे गांभीर्याने देत नाही व पर्यटकांना माहिती देण्यासाठी साधी मार्गदर्शक फलक सुद्धा लावण्यात आलेले नाही .
राखीव वनक्षेत्रात वणव्यावर नियंत्रण करण्यासाठी जाळपट्टी घेण्यात येतात. तसेच मजुरांची नेमणूक करून सनियंत्रक व वनरक्षक व वनपाल यावर सनियंत्रण करण्यात येत आहे, असे वनाधिकारी गायकवाड यांनी सांगितले. तसेच वनविभागामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणत्याही ठिकाणी वणवा लागल्याचे दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधून माहिती द्यावी. वन विभाग त्याबाबत तात्काळ आग विझवून आग लावणाऱ्या व्यक्तीची माहिती मिळाल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाही करेल असे त्यांनी सांगितले.




























































