ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे आज निधन झाले. सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 58 वर्षांच्या होत्या.

माधवी गोगटे यांनी मराठी नाटक, चित्रपट तसेच हिंदी- मराठी मालिकांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवला. ‘भ्रमाचा भोपळा’, ‘गेला माधव कुणीकडे’ ही त्यांची नाटके फार गाजली. अशोक सराफ यांच्यासोबत ‘घनचक्कर’ चित्रपटात त्यांनी भूमिका केली. ‘सत्त्वपरीक्षा’, ‘डोक्याला ताप नाही’ आदी चित्रपटांत त्यांनी काम केले.