
व्हॉट्सऍप वेळोवेळी नवीन आणि उपयुक्त अपडेट्स देत राहण्याची पूर्ण काळजी घेते. आताही व्हॉट्सऍप एक नवीन फीचर घेऊन येतोय. या नवीन फीचर्समुळे युजर्सना ऑडिओ नोट्सदेखील शेअर करता येईल.
व्हॉट्सऍपवर आतापर्यंत फोटो आणि व्हिडीओ शेअर करता यायचे. यापुढे मात्र व्हॉईस नोट्सदेखील शेअर करता येतील. स्टेटसवर शेअर केलेल्या व्हॉईस नोटला ‘व्हॉइस स्टेटस’ म्हटले जाऊ शकते. या नवीन अपडेटमुळे युजर्समध्ये आनंदाचे वातावरण आहे.
डब्ल्यूएबीटाइंफोच्या अहवालामध्ये नवीन फीचर कसे काम करेल, हे स्क्रीनशॉट्सद्वारे तपशीलवार सांगितले आहे. स्क्रीनशॉटनुसार, स्टेटस टॅबच्या तळाशी एक नवीन पर्याय किंवा आयकॉन असेल, ज्यामुळे युजर स्टेटस अपडेट्सवर व्हॉइस नोट्स वापरण्यास सक्षम असेल. तुम्ही ज्याला तुमचा स्टेट्स दाखवण्याची परवानगी द्याल, तो हा ‘व्हॉइस स्टेटस’ ऐकू शकेल. व्हॉइस स्टेटस व्हॉट्सऍप ‘एंड टू एंड एक्रिप्शन’अंतर्गत देखील येईल. सध्या या फीचरवर काम सुरू आहे.

























































