एसएस राजमौली – एकही चित्रपट फ्लॉप न झालेला दिग्दर्शक, वाढदिवसानिमित्त जाणून घ्या खास गोष्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसएस राजमौली यांना ओळखत नाही असा एकही चित्रपटप्रेमी शोधूनही सापडणार नाही. ‘बाहुबली’ आणि ‘आरआरआर’सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट बनवणाऱ्या राजमौली यांचा आज वाढदिवस आहे. देशातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांच्या यादीत राजमौली यांचा समावेश होतो. वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक कलाकारांनाही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगण यानेही त्यांना ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

एसएस राजमौली यांचा आज 49 वा वाढदिवस आहे. आजपर्यंत एकही चित्रपट फ्लॉप न झालेले दिग्दर्शक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या चित्रपटामध्ये आपल्याला काम करण्याची संधी मिळावी यासाठी कलाकारही आतुरतेने वाट पाहत असतात. भव्यदिव्य आणि तितकाच खिळवून ठेवणारा चित्रपट बनवण्यात ते माहीर आहेत. आज वाढदिवसानिमित्त त्यांच्याबाबत खास गोष्टी जाणून घेऊ.

– राजमौली यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1973 ला कर्नाटकातील अमरेश्वरा कॅम्प येथे झाला. नंदी हे त्यांचे घरातील नाव आहे.

– त्यांचे पूर्ण ना कुदुरी श्रीशैला श्री राजामौली आहे. कर्नाटकातील रायचूर येथील असल्याने त्यांची कन्नड भाषेवर चांगली पकड आहे.

– राजामौली हे प्रसिद्ध चित्रपट लेखक कवी विजयेंद्र प्रसाद यांचे पुत्र आहेत. विजयेंद्र यांनी ‘बाहुबली’ आणि ‘बजरंगी भाईजान’ सारख्या चित्रपटांच्या स्क्रिप्ट लिहिल्या आहेत.

– राजामौली यांनी व्यवसायाने कॉस्च्युम डिझायनर असलेल्या रामाशी लग्न केले. त्यांना एसएस कार्तिकेय आणि एसएस मयुका ही दोन मुलं आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by SS Rajamouli (@ssrajamouli)

– चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी राजामौली टीव्ही शोमधून आपल्या काल्पनिक गोष्टी प्रेक्षकांसमोर मांडायचे. राजामौली हे तेलगू टीव्ही शोचे दिग्दर्शक होते. त्यांनी ‘शांती निवास’ सारख्या मालिका केल्या आहेत.

– दाक्षिणात्य अभिनेता ज्युनियर एनटीआरला सुपरस्टार बनवण्यात राजामौली यांचा मोठा हात असल्याचं बोललं जातं. राजामौली यांनी ज्युनियर एनटीआरसोबत ‘स्टुडंट नंबर 1’ आणि ‘सिम्हाद्री’ हे सिनेमे केले होते, जे सुपरहिट ठरले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by SS Rajamouli (@ssrajamouli)

– राजामौली यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत केवळ 12 चित्रपट केले आणि हे सर्व चित्रपट हिट ठरले.

राजामौली यांचे चित्रपट

स्टूडेंट नंबर 1 (2001)
सिम्हाद्री (2003)
साई (2004)
छत्रपती (2005)
विक्रमारुकुडु (2006)
यानाडोंगा (2007)
मगधीरा (2009)
मर्यादा रमन्ना (2010)
ईगा (2012)
बाहुबली – द बिगिनिंग (2015)
बाहुबली – द कन्क्लूजन (2017)
RRR (2022)