
महिनोन्महिने जामीन मिळत नसल्यामुळे कारागृहांमध्ये आरोपींची गर्दी वाढतेय. यात नाहक गोवलेले निष्पाप लोकही भरडले जात आहेत. या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी रविवारी महत्त्वपूर्ण भूमिका घेत देशभरातील न्यायाधीशांवर असलेल्या दडपणाबाबत परखड भाष्य केले. आज आपण आरोपीला जामीन दिला तर उद्या आपल्याला टार्गेट केले जाईल ही भीती न्यायाधीशांना सतावतेय. याच भीतीने न्यायाधीश जामीन देण्यास टाळाटाळ करतात. याबाबत कोणी बोलले नाही, मात्र आता बोलण्याची वेळ आलीय. आपल्याला बोलायला हवे, असे स्पष्ट मत सरन्यायाधीशांनी व्यक्त केले आहे.
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी अलीकडेच सरन्यायाधीशपदाची धुरा स्वीकारली आहे. त्याबद्दल बार काwन्सिल ऑफ इंडियाने राजधानी नवी दिल्लीमध्ये त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी कायदा मंत्री किरेन रिजिजू हेदेखील उपस्थित होते. या समारंभात बोलताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी न्यायव्यवस्थेच्या सद्यस्थितीवर सडेतोड मते मांडली. जिल्हा न्यायाधीश आरोपींना जामीन देण्यास टाळाटाळ करतात. यामागे त्यांना लक्ष्य केले जाण्याची भीती असते. याच भीतीपोटी न्यायाधीश जामीन देताना कचरतात. त्यामुळे सध्या उच्च न्यायालयांमध्ये जामीन अर्जांचा ओघ वाढला आहे. भीतीपोटी जिल्हा न्यायालयांची कार्यक्षमता डळमळीत झाली आहे. याचा उच्च न्यायालयांच्या कामकाजांवर परिमाण झाला आहे, असे सरन्यायाधीश म्हणाले.
जिल्हा पातळीवरील न्यायव्यवस्थेमध्ये मोठय़ा सुधारणेची नितांत गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी वकिलांच्या बदलीच्या मुद्दय़ावर पेंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी चिंता व्यक्त केली. काही वकील बदलीसंदर्भात सरन्यायाधीशांची भेट घेणार आहेत. ही त्यांची वैयक्तिक भेट असू शकते. पण सरकारचा पाठिंबा असलेल्या कॉलेजियमच्या बाहेर अशा प्रकारे सातत्याने भेटी घेतल्या तर त्याचा न्यायव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे, असे मत रिजिजू यांनी मांडले होते.
न्यायाधीशांवर विश्वास ठेवायला शिका!
न्यायाधीशांच्या कार्यपद्धतीवर अविश्वास व्यक्त करणाऱयांना सरन्यायाधीशांनी खडे बोल सुनावले आहेत. जिल्हा न्यायपालिका ही देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांइतकीच महत्त्वपूर्ण आहे. जिल्हा न्यायाधीश वास्तवात सर्वसामान्य नागरिकांची न्याय मिळण्याची अपेक्षा पूर्ण करतात. न्यायदानात जिल्हा न्यायपालिकेचे अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे. टीकाकारांनी न्यायाधीशांवर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे, त्यांच्याबद्दल आदराची भावना ठेवली पाहिजे. न्यायाधीशांच्या रूपात आमच्याकडे स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कोणताही मंच नाही, असे खंतही सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी यावेळी व्यक्त केली.
सत्तेत असलेल्यांना प्रश्न जरूर विचारा
देशात सद्यस्थितीत जे लोक सत्ताधाऱयांना जाब विचारतात, त्यांना टार्गेट केले जात आहे. याबाबतही सरन्यायाधीशांनी मत मांडले आहे. सत्तेत असलेल्यांना प्रश्न जरूर विचारा, तो प्रत्येक नागरिकाचा हक्कच आहे. याच वेळी जे प्रामाणिकपणे काम करीत असतील त्या सत्ताधाऱयांवर विश्वास ठेवायला पाहिजे, सत्ताधारी आपल्या चांगल्यासाठीही काम करतील, अशी आशा बाळगायला हवी. कायदेशीर किंवा सामाजिक मुद्दय़ांना दोन बाजू असतात हे आपण लक्षात घ्यायला हवे, असे सरन्यायाधीश म्हणाले.
सरन्यायाधीश नेमके काय म्हणाले…
जिल्हा न्यायपालिकेत सुधारणेला भरपूर वाव आहे. सर्वप्रथम आपण न्यायाधीशांबद्दल आदराची भावना निर्माण केली पाहिजे. जिल्हा न्यायपालिका लहान नाही. सर्वोच्च न्यायालय मोठे निर्णय घेऊ शकते, परंतु जिल्हा न्यायालय सामान्य नागरिकांना शांतता, आनंद आणि आत्मविश्वास देणाऱया छोटय़ा प्रकरणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.
न्यायाधीशांना गुह्याची तीव्रता लक्षात येत नाही, असे नाही. ते योग्य निर्णय घेण्यास सक्षम आहेत. मात्र आरोपीला जामीन मंजूर केला तर दुसऱयाच दिवशी जामीन कसा दिला, असे विचारले जाईल व आपल्याला टार्गेट केले जाईल ही भीती त्यांना आहे.

























































