गोलपोस्टच्या पलीकडचे, बापसे बेटा सवाई…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जॉर्ज वेह (सीनियर) हे सध्या लायबेरिया या आफ्रिकन देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. अतिशय गरिबीत जन्माला आलेल्या वेह यांनी मोठय़ा परिश्रमाने आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रात गरुडझेप घेतली. नामांकित क्लब्सचे प्रतिनिधित्व करीत त्यांनी 1995 मधील फुटबॉलचा प्रतिष्ठेचा ‘बॅलन डी ओर’ पुरस्कारही पटकावला, पण लायबेरिया हा छोटा देश फिफा विश्वचषक फायनल सत्रात पोहोचू न शकल्याने वेह यांचे फुटबॉल विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न अधुरेच राहिले होते. मंगळवारी अखेर त्यांचा पराक्रमी पुत्र टीम वेह याने अमेरिकन संघाचे प्रतिनिधित्व करीत गोलही केला आणि ‘ब’ गटात वेल्शविरुद्ध आपल्या संघाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. टीमने अखेर वडिलांचे अधुरे स्वप्न पूर्ण करीत अभिमानास्पद कामगिरी साकारली. आहे की नाही बापसे बेटा सवाई.