
महापालिका भांडकली निधीतून शहरात 25 कोटी रुपये खर्च करून 17 रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यातील 6 रस्ते पूर्ण झाले असून, अन्य 11 रस्ते अपूर्ण आहेत. पाकसामुळे रस्ते करण्यात अडचण येत असल्याचे कारण महापालिकेने गणेशोत्सक काळात दिले. हे चर्चेत असलेल्या रस्त्यांचे पाकसाळा संपकून दोन महिने झाले तरी रस्ते दुरुस्तीचे काम अद्याप अपूर्ण आहे. याबाबत महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांना किचारले असता, रस्ते होतील, असे त्यांनी सांगितले.
सोलापूर शहरातील सात रस्ता, जुळे सोलापूर,
डॉ. आंबेडकर चौक, नकी केस, बसस्थानक, बलिदान चौक, रूपाभकानी परिसर, गुरुनानक चौक परिसरातील रस्ते दुरुस्ती पालिकेच्या भांडकली निधीतून करण्यासाठी पालिका अंदाजपत्रकात प्रथमच 25 कोटींची तरतूद करण्यात आली. गणेशोत्सव व नवरात्र उत्सव काळात रस्ते करण्याची मागणी होती.
पावसाचे कारण आणि डांबर मिळत नसल्याने रस्तेकाम थांबले. त्यानंतर दिकाळीत मजूर गावाकडे गेल्याने काम लांबवले, त्यानंतर जुळे सोलापूर, सात रस्ता या भागांतील रस्ते केले. अन्य 11 रस्ते अपूर्ण अवस्थेत आहेत. ते रस्ते अद्याप झाले नाहीत. एका बाजूने रस्ते केले तर अन्य बाजू तशीच आहे, याचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे.
शहरातील 17 रस्ते केल्यानंतर अन्य 400 रस्ते करणे आवश्यक आहे. महापालिकेने याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यावर शासन आणि महापालिकेकडून काहीच कारकाई होत नाही. त्यामुळे 17 रस्ते होतील अन्य रस्त्याचे काय? असा प्रश्न उपस्थित होतो. सिद्धेश्वर मंदिर ते मार्केट पोलीस चौकीपर्यंत एक बाजूचा रस्ता ड्रेनेज लाइन पाण्यामुळे बंद आहे. त्या रस्त्याकर येण्याऱया पाण्याचा बंदोबस्त महापालिकेने केला नाही. मैलामिश्रीत पाणी रस्त्यावर सोडणे गुन्हा आहे. यात महापालिका फौजदारी कारकाई करू शकते. या रस्त्यावर यात्राकाळात ड्रेनेज लाईनमधून जाके लागेल.
दोन टप्प्यांतील दुरुस्तीमुळे लेव्हलचा प्रश्न
सोलापूर शहरातील 25 कोटी रुपये खर्चून रस्ते दुरुस्ती करताना कामाचा दर्जा महत्त्वाचा आहे. रस्ते दुरुस्ती दोन टप्प्यांत केल्याने त्यांच्या लेव्प्रहलचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कामाच्या दर्जाची तपासणी आवश्यक आहे




























































