Video – शरद पवारांच्या निर्णयाबद्दल अजित पवार यांना पूर्वीच कल्पना होती?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ajit-pawar-and-sharad-pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते, नेत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. कार्यकर्ते आणि नेते यांनी शरद पवार यांनी घोषणा करताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आपली नाराजी व्यक्त केली. तुम्ही निवृत्त होऊ नका असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी रडत-रडत समजावण्याचा प्रयत्न केला. या कार्यकर्त्यांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी म्हटले की भावविक होऊ नका, काकी (प्रतिभा पवार) म्हणाल्या की ते अजिबात निर्णय मागे घेणार नाही. “नव्या अध्यक्षाला आपण साथ देऊ, त्याच्या पाठिशी उभे राहू”, असे अजित पवार म्हणाले.

कार्यकर्ते आणि नेत्यांशी बोलताना अजित पवार यांनी म्हटले की, “हा एक प्रकारचा शॉक आहे. भाकरी फिरवायची म्हणजे लोकांनी त्याचा वेगळा अर्थ काढला होता. पवार साहेब परिवाराचे प्रमुख म्हणूनच काम करणार आहेत. नवा अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला तो का नको ? ते कालच हा निर्णय जाहीर करणार होते, मात्र मविआच्या सभेमुळे त्यांनी हा निर्णय पुढे ढकलला होता.”

पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीत खळबळ; कार्यकर्ते, नेते भावूक, जयंत पाटलांना अश्रू अनावर

साहेब वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहे. नवा अध्यक्ष पावर साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच खाम करेल. साहेब अध्यक्ष राहिले तरच अल्पसंख्यकांच्या पाठीशी उभे राहतील असा का विचार करता. ते अध्यक्ष असो अथवा नसोत ते अल्पसंख्यकांच्या पाठीशी उभे आहेतच. भानविक होऊ नका. काकी म्हणाल्या की ते अजिबात निर्णय मागे घेणार नाही. नव्या अध्यक्षाला आपण साथ देऊ, त्याच्या पाठिशी उभे राहू. साहेबांच्या जीवावारच राष्ट्रवादी काँग्रेस चालणार आहे, हे सांगण्यासाठी कोणत्या कुडमुड्या ज्योतिषाची गरज नाही, असे अजित पवार यांनी म्हटले.