
देशात गेल्या 14 दिवसांत कोरोना रुग्णांसह कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली असून आज दिवसभरात 3 जणांचा मृत्यू झाला. यातील दोघे पंजाबचे तर एक पश्चिम बंगालमधील रहिवासी आहे. दिवसभरात 1 हजार 272 कोरोना रुग्ण सापडले. दरम्यान, सक्रिय रुग्णांच्या संख्येतही विक्रमी घट झाली असून 21 हजारांवरून हा आकडा 15 हजार 515 कर आला आहे.
देशात मार्च आणि एप्रिल महिन्यात काढत गेलेल्या कोरोना रुग्णांची संख्या मे महिन्यांत वाढत जाईल, असा इशारा केंद्रीय आरोग्य खाते आणि टास्क फोर्सने दिला होता. त्या पार्श्वभूमीवर, देशभरात कोरोना मॉकड्रिल घेऊन सरकारी, महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला सज्ज ठेवण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात मे महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने विक्रमी घट झाली. त्यामुळे आता देशभरात कोरोना नियंत्रणात आल्याचे चित्र आहे. दरम्यान, देशभरात आतापर्यंत 220 कोटी 66 लाख जणांना कोरोना लस देण्यात आली आहे.
मुंबईत 18, राज्यात 75 रुग्ण
मुंबईसह राज्यात आज रुग्णसंख्येत मोठी घसरण पाहायला मिळाली. मुंबईत 18 तर राज्यात 75 रुग्ण सापडले. राज्यात एकाही कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. दिकसभरात 178 जण कोरोनामुक्त झाले तर सक्रिय रुग्णांची संख्या हजारच्या खाली आली आहे. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 864 कर पोहोचली आहे. मुंबईतही सक्रिय रुग्णांची संख्या घसरून 253 कर पोहोचली आहे.






















































