चायनीज फोनने आयफोनला मागे टाकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोणत्याही कंपनीचा स्मार्टफोन खरेदी करताना त्या फोनचा कॅमेरा कसा आहे, याचा विचार ग्राहकाकडून केला जातो. फोटोग्राफीसाठी फोनचा कॅमेरा चांगला असल्यास ग्राहक त्या फोनला पसंती देतात. जगभरात अनेकांचा समज आहे की, आयफोन हा फोटोग्राफीसाठी सर्वात चांगला फोन आहे, परंतु हे खरे नाही. सर्वात बेस्ट कॅमेऱ्याचा फोन हा आयफोन नसून चीनमधील हुवई कंपनीचा हुवेई पुरा 80 अल्ट्रा हा फोन आहे.

जगातील टॉप कॅमेऱ्याच्या फोनची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून या यादीत आयफोन 17 च्या सीरिजमधील फोनला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. दुसऱया स्थानावर विवो एक्स 300 प्रो आहे. या फोनमध्ये 200 मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स 100 एक्स डिजिटल आणि 3.7 एक्स ऑप्टिकल झूम देण्यात आली आहे. तिसऱया स्थानावर ओप्पोचा फाइंड एक्स 8 अल्ट्रा फोन आहे. या फोनमध्ये पाच सेन्सरचा कॅमेरा सेटअप दिला आहे. यात दोन पेरिस्कोप लेन्स आणि 3 एक्स आणि 6 एक्स तसेच वेगळे क्रोमा सेन्सर दिले आहे. आयफोन 17 प्रो चौथ्या स्थानावर आहे.