सावधान! एक्सपायरी अंडे खाल्ल्याने होऊ शकते फूड पॉइजनिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपण रोज आहारामध्ये अंडी खातो. परंतु ही अंडी एक्सपायरी डेट न पाहता खाल्ल्यास खूप गंभीर परीणामांना सामोरे जावे लागते. मात्र ही छोटी चूक आरोग्यासाठी मोठा धोका ठरू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, एक्सपायरी अंडे खाल्ल्यास सर्वात जास्त परिणाम पचनसंस्थेवर होतो. प्रोटीन खराब झाल्यामुळे शरीर ते नीट पचवू शकत नाही. त्यामुळे गॅस, पोट फुगणे, जडपणा जाणवतो.

चेहरा काळवंडल्यानंतर दह्याचा असा फेस पॅक चेहऱ्याला लावा, लगेच येईल निखळ उजळपणा

जुने किंवा खराब अंडे खाल्ल्यास त्यात बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे आपल्याला उलटी, जुलाब, पोटदुखी, ताप, डिहायड्रेशन असे गंभीर त्रास होऊ शकतात. एकदा चुकून खाल्ले तर मोठा धोका नसतो. पण असे अंडे वारंवार खाल्ल्यास गट हेल्थ आणि इम्युनिटीवर वाईट परिणाम होऊ शकतो.

खराब अंडे ओळखायचे कसे?

अंडे आधी पाण्यात टाकून बघावे. हे अंडे बुडले तर ते ताजे अंडे आहे. समजा अंडे पाण्यावर तरंगले तर ते खराब आहे हे समजावे. फोडल्यावर वाईट वास आला तर खाऊ नका.