Gujrat Earthquake – टोंगानंतर गुजरातच्या राजकोट जिल्ह्यात भूकंपाचा धक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातच्या राजकोट जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल इतकी होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

गांधीनगर येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मॉलॉजिकल रिसर्च’ने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी 5 वाजून 41 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू राजकोटच्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे 7 किलोमीटर अंतरावर होता.