
मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को ग्राउंडवर झालेल्या म्युझिक कन्सर्टदरम्यान ड्रग्सच्या अतिसेवनामुळे दोन युवकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्यातील फरार आरोपी आयुष विकी साहित्य (वय 24, रा. उल्हासनगर) हा मुंबई-गोवा महामार्गाने गोव्याकडे पळून जात असल्याची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.आरोपीने “एक्सटसी” या अमली पदार्थांचे कॉन्सर्टमध्ये वितरण केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्याला पुढील कारवाईसाठी वनराई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

































































