
ठाण्यात नालेसफाईच्या मोहिमेला सुरुवात झाली असली तरी दिव्यात अद्याप नालेसफाईला मुहूर्त लागलेला नाही. जागोजागी नाले तुंबलेले असून प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी दिव्यातील नाल्यांची सफाई पूर्ण करा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. दिवा शहरात दरवर्षी नालेसफाईत चुकारपणा केला जात असल्याने अनेक भागात पाणी तुंबते. ही गंभीर बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने आतापासूनच महत्त्वाच्या नाल्यांचे सर्वेक्षण करून ते पूर्णतः स्वच्छ करावेत, नाल्यातून काढलेला गाळ तत्काळ उचलण्यात यावा, अशी मागणी शहर महिला संघटक ज्योती पाटील यांनी केली आहे.


























































