विजयाचा दुष्काळ संपवण्याचे पंजाबपुढे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाब किंग्सचा संघ जिंकणार तरी कधी, हा सर्वांना प्रश्न पडला आहे. पंजाबला गेल्या पाचही सामन्यांत एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे अव्वल स्थानावरील आरसीबीशी रविवारी दोन हात करताना त्यांच्यापुढे विजयाचा दुष्काळ संपवण्याचे आव्हान असणार आहे.

पंजाबचे प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग चांगल्या फॉर्मात आहेत, पण श्रेयस अय्यर मात्र सपशेल अपयशी ठरताना दिसत आहे. मुंबईकर सूर्यांश शेडगे फलंदाजीत चमक दाखवत आहे. गोलंदाजीत अर्शदीप सिंगचा अपवाद वगळला तर एकही गोलंदाज चांगल्या फॉर्मात नाही आणि हीच त्यांच्यासाठी मोठी डोकेदुखी आहे.

विराट कोहली फॉर्मात आला आहे आणि हे आरसीबीच्या पथ्यावर पडणारे आहे. देवदत्त पडीक्कल आणि जेकब बेथेलही दमदार फलंदाजी करत आहेत. गोलंदाजीमध्ये भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड ही जोडी अचूक आणि भेदक मारा करत आहे.