Ratnagiri News – वीजेचे धोकादायक खांब तात्काळ बदला, जिल्हाधिकाऱ्यांच्या महावितरणला सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्ह्यातील धोकादायक वीजेचे खांब महावितरणने तातडीने बदलावेत असा आदेश रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिला आहे. अनेक ठिकाणी गंजलेले व जीर्ण झालेले वीजेचे खांब वर्षानुवर्षे उभे आहेत. पावसाळ्यात हे वीजेचे खांब पडून अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे धोकादायक वीजेचे खांब तात्काळ बदलणे आवश्यक आहे. रत्नागिरी शहरातील थिबा पॅलेस येथील वीजेचा धोकादायक खांब आज बदलण्यात आला.