
केवणी आणि काल्हेर येथील राखीव वन व गुरचरण क्षेत्रामध्ये सुरू असलेली अवैध अतिक्रमणे आज जिल्हा प्रशासनाने जमीनदोस्त केली. याठिकाणी बेकायदा रेती साठवणूक मोठ्या प्रमाणात केली जात होती. महसूल विभागाच्या कारवाईमुळे भिवंडी परिसरातील रेतीमाफिया आणि भूमाफियांच्या बेकायदेशीर कारवायांना लगाम बसला आहे.
खाडीमधून अनधिकृतरीत्या रेती उपसा करून केवणी आणि काळ्हेर येथील राखीव वन व गुरचरण क्षेत्रामध्ये ती साठवली जात होती. रस्त्यालाही २३ डेपो तयार केले होते. याबाबतची माहिती मिळताच जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या आदेशाने भिवंडी तहसीलदार अभिजित खोले यांच्या पथके हे डेपो उद्ध्वस्त केले.
महसूल विभागाने यापूर्वीही भिवंडी तालुक्यातील विविध भागांमध्ये अवैध रेती उत्खनन, वाहतूक व साठवणुकीविरोधात सातत्याने कारवाया करून अनेक गुन्हे दाखल केले आहेत.






























































