पुण्यात मध्यरात्री रेव्ह पार्टी उधळली, 100 तरुण-तरुणींना ताब्यात घेतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यातील तुळापूर परिसरातील एका फार्महाऊसवर आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी पहाटे धाड टाकली. यावेळी 100 पेक्षा जास्त तरुण-तरुणी मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. त्यांना ताब्यात घेत पोलिसांनी गांजा, तंबाखूजन्य पदार्थ असा 85 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.