
खराब हवामानामुळे रायपूरला जाणारे इंडिगोचे विमान नागपूरकडे वळवण्यात आले. या विमानात छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री अरुण साव, माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, राज्याचे काँग्रेस अध्यक्ष दीपक बैज आणि इतर अनेक राजकीय नेते प्रवास करत होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
द प्रिंटने दिलेल्या वृत्तानुसार, इंडिगोचे 6ई-5138 (6E-5138) हे विमान गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास रायपूरमधील स्वामी विवेकानंद विमानतळावर उतरणार होते. मात्र, रायपूरमध्ये सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे विमान रायपूरला लँडिंग करता आले नाही. यामुळे हे विमान नागपूरकडे वळवण्यात आले. नागपूरमध्ये विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले. त्यानंतर रात्री 10.40 च्या सुमारास तिथून पुन्हा रवाना झाले.


























































