
लखनौहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. टेकऑफ घेण्याआधीच ही धमकी मिळाल्याने विमान थांबवण्यात आले आणि सखोल सुरक्षा तपासणी सुरू करण्यात आली. सध्या विमान आणि प्रवाशांच्या सामानाची कसून तपासणी सुरू केली.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, इंडिगोचे 6E2111 हे विमान सकाळी 10.45 वाजता लखनौहून दिल्लीला जाणार होते. विमानात एकूण 180 प्रवासी होते. लखनौहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाच्या शौचालयात एका टिश्यू पेपरवर हाताने लिहिलेली एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत विमानात बॉम्ब असल्याचे म्हटले होते. या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. धमकीनंतर विमान थांबवण्यात आले आणि विमानासह प्रवाशांच्या सामानाची कसून तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर सदर धमकी खोटी असल्याचे निष्पन्न झाले.




























































