संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार जाहीर; अशोक पत्की, अरुण नलावडे, आनंद भाटे, सुभाष नकाशे यांचा सन्मान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रतिष्ठेचे संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार आज जाहीर झाले. अभिनेता अरुण नलावडे, संगीतकार अशोक पत्की, गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, मुकुंद मराठे, रंगकर्मी प्रमोद पवार, नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे, कथ्थक गुरू मनीषा साठे, शास्त्रीय नृत्यांगना शुभदा वराडकर आदी कलावंतांना पुरस्कार मिळाले आहेत.

केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत संगीत नाटक अकादमीतर्फे संगीत, नृत्य, नाटय़, लोककला क्षेत्रातील अमूल्य योगदान देणाऱया कलाकारांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. बुधवारी रात्री 2024 आणि 2025च्या 108 पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली. तसेच युवा पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातून भावार्थ देखणे (भारुड), बाळकृष्ण मसगे (चित्रकथी), प्रवीण जाधव (जागर) यांना युवा पुरस्कार मिळाला आहे.